🚩【HISTORY MAHARASHTRA】🚩 Photos & Videos on Instagram

@history_maharashtra  🔥ओळख_महाराष्ट्राची🔥 ☝शिवरायांच्या इतिहासाची☝ ⛳शिवकालीन दिनविशेष⛳ 📯इतिहास महाराष्ट्राचा📯 👑इतिहास गडदुर्गांचा👑 🅰🌛ⓂℹN:-📺 @amol_toraskar

https://youtu.be/8Cx_puCOIRg

3 hours ago

🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष #२३_फेब्रुवारी_१७३९ 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 चिमाजी आप्पांच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंडयावर हल्ला चढवला. चिमाजी आप्पा यांनी १७३९ साली फिरंगणाच उच्चाटन केल. ४ वर्षे सुरु असलेल्या मोहिमेचा शेवट वसई जिंकून साजरा केला गेला. वसईच्या लढाईत विजय प्राप्त करून (२३ मे १७३९) पोर्तुगीजांचे त्या परिसरातील वर्चस्व नष्ट करण्याच्या महापराक्रमामुळे चिमाजींचे नाव लोकमानसात रुजले आहे. या मोहिमेवरून आणलेल्या पोर्तुगीज घडणीच्या भल्याथोरल्या पितळी घंटा आजही महाराष्ट्रात जागोजागी पाहायला मिळतात. मराठी भाषेत वाक्प्रचाराच्या रूपाने ती कायमची विराजमान झालेली आहे! पण याव्यतिरिक्तसुद्धा चिमाजींचे कर्तृत्व किती मोठे होते☝ थोरले बंधू बाजीराव पेशवे (पेशवेकाल १७२०-४०) यांच्या झगमगत्या कारकीर्दीत चिमाजीआप्पांनी सदैव त्यांना सावलीसारखी साथ दिली. या जोडीचा निर्देश काही वेळा ‘राम-लक्ष्मण’ असा केला जातो, यातच काय ते आले. अर्थात लक्ष्मण हा कितीही गुणी व कर्तृत्ववान असला तरी रामाच्या कर्तृत्वापुढे त्याचे कर्तृत्व काहीसे झाकोळून जाते, तसेच चिमाजींबाबत घडले आहे. धोरण आणि अंमलबजावणी याबाबतींतील मुख्य कर्ताकरविता आणि योजक महापुरुष बाजीराव पेशवाच होता आणि चिमाजी हा त्याबाबतची योग्य समज असलेला निष्ठावंत बंधू व सखा होता. बाजीराव-चिमाजीआप्पा यांच्या कर्तृत्वाबाबतचे हे मर्म ध्यानी घेतल्याशिवाय त्यांच्या श्रेष्ठत्वाचा पैस समजू शकत नाही. पिता बाळाजी विश्वनाथ यांनी घातलेल्या पायावरून कर्तृत्वाचे भलेमोठे उड्डाण बाजीरावाने घेतले आणि या उड्डाणात त्याच्यासह झेपावलेला उपग्रह म्हणजे चिमाजीआप्पा! स्वराज्याचे संस्थापक आणि मराठय़ांच्या अस्मितेची प्रेरक शक्ती असणाऱ्या शिवछत्रपतींची पुण्याई आणि छत्रपती शाहूमहाराज यांची छत्रछाया अशा दुहेरी आधारशिळेमुळे हे उड्डाण शक्य झाले. नव्या दमाच्या नेतृत्वाची एक बहुजातीय फळी बाजीरावाने उभी केली. मराठय़ांच्या राजकारणाला उत्तराभिमुख बनवून मराठा साम्राज्यविस्ताराला चालना देण्यात बाजीराव पेशव्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते आणि चिमाजींचे सारे जीवितकार्य त्याला पूरक होते. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #संदर्भ-सह्याद्रीचे अग्निकुंड #सह्याद्री_प्रतिष्ठान 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ आपण आमच्या पेज ला सहभागी होऊ शकता #history_maharashtra hashtag वापरून ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ @history_maharashtra ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 @history_maharashtra #ओळख_महाराष्ट्राची #शिवरायांच्या_इतिहासाची ________________________________ at Pune, Maharashtra

436 2
12 hours ago

🚩 कुसुमाग्रजांनी शूर वीरांवर कविता करताना म्हटले आहे☝ "दगडावर दिसतील अजुनि तेथल्या टाचा" "ओढय़ात तरंगे अजुनि रंग रक्ताचा" "क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा" "अद्याप विराणी कुणीवाऱ्यावर गात…" 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 ओळखाल का? कोण होते ते वीर????????????? _________________________ _________________________ at Pune, Maharashtra

2k 4
20 hours ago

🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२२_फेब्रुवारी_१६६५ छत्रपती शिवाजी महाराजांनी कारवार जिंकले. आदल्या दिवशीच छत्रपती शिवाजी महाराज ससैन्य कारवार जवळ येऊन धडकले होते ते जिंकण्याच्या उद्धेशाने. कारवारच्या बाहेर खाडीच्या तोंडाशी शिवरायांच्या सैन्याचा मुक्काम होता. इथे त्या शेरखानाने इंग्रज व तेथील सर्व व्यापाऱ्यांकडून मोठी रक्कम जमवून ती नजरण्याच्या स्वरूपात शिवाजी महाराजांसमोर रुजू केली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #संदर्भ-सह्याद्रीचे अग्निकुंड © "सह्याद्री प्रतिष्ठान -महाराष्ट्र" 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ आपण आमच्या पेज ला सहभागी होऊ शकता #history_maharashtra hashtag वापरून ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ @history_maharashtra ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 @history_maharashtra #ओळख_महाराष्ट्राची #शिवरायांच्या_इतिहासाची ________________________________ #Follow: #swarajya_rakshak_sambhaji #Shantidut_mardani_akhada #photographers_of_maharashtra #chhatrapati_shivaji_maharaj #durg_naad #miekdurg #durg_bhatkanti_trekkers #sahyadri_cha_shiledar @chhatrapati_shivaji_maharaj_ @sambhaji_maharaj_1689 @budhbhushan_ @chhatrapati_sambhaji_maharaj @sambhaji_maharaj_1689 @chhatrapati_shivaji_maharaja @chhatrapati__shivaji_maharaj at Pune, Maharashtra

2k
1 day ago

🚩 शिवाजी महाराजांचे ध्येय व जीवनउद्देश🔥 १) ‘धार्मिक-राज्य’ नव्हे; तर, एतद्देशीयांचे राज्य २) ‘वतनदारांचे राज्य’ नव्हे; तर, जनतेचे वा रयतेचे राज्य ३) वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हे; तर, जनतेच्या कल्याणासाठी व स्वातंत्र्यासाठी संघर्ष ४) जातधर्म-निरपेक्षवृत्तीने जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व सत्यासाठी लढा ५) नव्या, समतापूर्ण व न्यायी व्यवस्थेचा आग्रह आणि तिच्या प्रतिष्ठापनेसाठी, लढाई वा युद्ध म्हणजे केवळ एक साधन… युद्धखोर वृत्तीचा पूर्ण अभाव ६) भरतभूमीतल्या कोट्यवधी भूमिपुत्रांच्या कल्याणाची स्वप्न पहाणारी दूरदृष्टी ७) प्रसंगानुरुप लढाईसाठी गनिमीकाव्यासारखे अनोखे डावपेच, खंबीरता व लवचिकता बाळगणारे युद्धनेतृत्त्व… गरजेपुरत्याच व नाईलाजास्तव छोट्या लढाया; पण, त्यातून विजयाचा मोठा अन्वयार्थ ८) लढण्यामागचं जाज्ज्वल्य तत्त्वज्ञान आणि जनकल्याणाच्या स्वप्नांच्या पुर्ततेसाठीच्या एकाच ध्यासामुळे, ‘रयतेचा राजा’ व ‘जाणता राजा’, या पदवीला प्राप्त…. शिवछत्रपतींच्या राजवटीत जातधर्मविद्वेष औषधालाही सापडत नव्हतं; म्हणूनच, जातधर्मीय अभिनिवेश पूर्णपणे बाजूला ठेऊन, या राजासाठी व त्याच्या राज्याच्या उभारणीसाठी सगळीच प्रजा, समान ध्येयानं प्रेरित होऊन एकवटली होती 🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽 शिवाजी महाराजांचे अलौकिकत्व….. १) सामान्यांतून असामान्य माणसे घडवली…. महाराष्ट्रातल्या दगडांना जणू शिवछत्रपतींचा ‘परिसस्पर्श’ झाला आणि त्यांच्या जगण्याचं ‘सोनं’ झालं २) स्वराज्यासाठी मरमिटण्याच्या ‘मावळी प्रेरणे’चा उगमस्त्रोत… केवळ, राज्यनिर्मितीतून नव्हे; तर, स्वातंत्र्य-समतेच्या महान मूल्यांमधूनच, ही बलिदानाची सांस्कृतिक-प्रेरणा ३) जनतेची अभंग निष्ठा, बारा वर्षे स्वराज्याच्या शत्रूंकरवी जाळपोळ व प्रदीर्घ हालअपेष्टा सोसूनही जनता सदैव ठामपणे पाठीशी ४) जनता आणि सैन्य यांचा अन्योन्य संबंध , खडे सैन्य कमी; पण जनतेची राजावरील श्रद्धा गरजेनुसार सैनिकांत रुपांतरित होत रहाणं, ही नित्याची बाब… सामान्य जनतेतूनच बहुआयामी ‘कौशल्य-निर्मिती’ ५) सर्वच दृष्टीने अतिशय प्रबळ असलेल्या विरोधकांचा पराभव… सैनिकी सामर्थ्यापेक्षाही, रयतेच्या जागृत झालेल्या प्रखर ‘स्वातंत्र्यकांक्षे’ च्या बळावर ६) एतद्देशीयांची कित्येक शतकांची ‘पराभूत व लाचार’ मानसिकता बदलून, त्यांच्यात ‘विजिगीषु’ वृत्ती निर्माण केली ७) रयतेची आणि सैन्याची श्रद्धा व निष्ठा, एकाच व्यक्तिभोवती केंद्रित…. त्यामुळेच, लाखोंचं प्रबळ शत्रूसैन्य, एतद्देशीयांची ‘स्वातंत्र्यकांक्षा’ दडपण्यास असमर्थ ठरलं ८) शिवाजी राजाची रयत नव्हती; तर, ‘शिवाजी’ ‘रयतेचा राजा’ होता☝

6k 385
2 days ago

🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 #२१_फेब्रुवारी_१६६० छत्रपती शिवाजी महाराजांनी अकोला जिंकले 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 #२१_फेब्रुवारी_१६६५ कर्नाटकातील कारवार येथील इंग्रजांच्या वखारीत शिवाजी महाराज छापा घालण्याची तयारी करत असल्याची खबर इंग्रजांच्या हेरांना कळाली, स्वतः शिवराय ४००० मावळ्यांसहित कारवार येथे येऊन धडकले आणि हल्ला करण्याची तयारी करत असल्याची बातमी इंग्रजांना समजली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 #संदर्भ-सह्याद्रीचे अग्निकुंड © "सह्याद्री प्रतिष्ठान -महाराष्ट्र" 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ आपण आमच्या पेज ला सहभागी होऊ शकता #history_maharashtra hashtag वापरून ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ @history_maharashtra ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 @history_maharashtra #ओळख_महाराष्ट्राची #शिवरायांच्या_इतिहासाची ________________________________ #Follow: #swarajya_rakshak_sambhaji #Shantidut_mardani_akhada #photographers_of_maharashtra #chhatrapati_shivaji_maharaj #durg_naad #miekdurg #durg_bhatkanti_trekkers #sahyadri_cha_shiledar @chhatrapati_shivaji_maharaj_ @sambhaji_maharaj_1689 @budhbhushan_ @chhatrapati_sambhaji_maharaj @sambhaji_maharaj_1689 @chhatrapati_shivaji_maharaja @chhatrapati__shivaji_maharaj @r_raygad @sahayadri_travellers @sahyadriche_shiledar @durg_dhyas @forts_treasure @_sahyadri_kille_official_ @jay_maharashtra_d @garja_maharashtra_majha @yuva_maharashtra at Pune, Maharashtra

3k 11
2 days ago

🚩 #शिवजन्मोत्सव_सोहळा #१९_फेब्रुवारी_२०१९ आपल्या असामान्य गुणांमुळे जनमानसांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारा जाणता राजा अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. एक आदर्श राज्यकर्ता म्हणून त्यांचे नाव अगदीअगत्याने घेतले जाते आणि यापुढेही कायमच घेतले जाईल. ✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳ महाराजांच्या जयंती निमित्ताने महाराजांचे काही गुण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. महाराजांचा हा समृद्ध वारसा आपण पुढच्या पीढीपर्यंतही पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. 1) सर्वधर्मसमभाव: शिवाजी महाराजांच्या स्वधर्माविषयी प्रचंड निष्ठा आणि आदर होता. तरीही देखील त्यांनी कधीही इतर धर्मांचा तिरस्कार किंवा अनादर केला नाही, त्यांच्या सैन्यात हिंदूंप्रमाणे मुस्लिम मावळेही होते. आजच्या काळात लहानपणापासूनच मुलांमध्ये हा गुण रुजवणे, महत्त्वाचे झाले आहे. 🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽 2)साहसी व धाडसी वृत्ती: कोणत्याही संकटात, अडचणीत न डगमगणारे महाराज आणि त्यांच्या साहस कथा ऐकतच आपण लहानाचे मोठे झालोत. कधी शक्ती तर कधी युक्तीच्या जोरावर यशस्वीरित्या साहस कसे करावे, हे महाराजांकडून शिकण्यासारखे आहे. 🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽 3)कमालीची निष्ठा: देश, स्वराज्य आणि काम यांच्या प्रती कशी निष्ठा असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाराज. महाराजांची हीच निष्ठा आज जर आपण आपल्या दैनंदिन कामात आणली तर यशाकडे होणारी आपली वाटचाल कोणीच रोखू शकणार नाही. 🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽 4)स्त्रियांचा आदर: आजकाल स्त्रियांवरील वाढते अत्याचार, शोषण हे पाहता आता स्त्री स्वातंत्र्यासोबत स्त्रीयांचा आदर करा हे सांगावे लागत आहे. अशा काळात महाराजांकडून शिकवण नक्कीच पुढील पीढीला देऊ शकतो. 'स्त्रियांची इज्जत कायम राखली पाहिजे मग ती कुणीही असो' अशी महाराजांची भूमिका होती. महिलांविरुद्ध अत्याचाराला महाराजांनी कधीही थारा दिला नाही. 🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽 5)नेतृत्व गुण: शिवाजी महाराजांचा अतिशय महत्त्वाचा गुण म्हणजे नेतृत्व. हातात अधिकार असताना सर्वसमावेषक विचार करणे, इतरांना सोबत घेऊन पुढे जाणे, कुठेही दुजाभाव होऊ न होणे असे आदर्श नेतृत्व पुढच्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. 🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽 6) संघ भावना: महाराजांनी उभं केलेलं 'स्वराज्य' हे सांघिक भावनेचं (टीमवर्कच) बेस्ट उदाहरण आहे. कुठे, कधी कुणाची गरज आहे. कुणाला पुढं करायचं, सोबत घेऊन काम कसं करायचं आहे त्या टीमच्या साहाय्याने विजयश्री कशी प्राप्त करायची हे महारांजी अनेकवेळा दाखवून दिलंय. कारण सांघिक भावनेमुळेच अनेक कामे सोपी होतात, लवकर होतात. आचार-विचारांची देवाण घेवाण होते. 🔼🔼🔼🔼🔼🔼🔼🔼🔼🔼🔼

5k 9
3 days ago

🚩 महाराज क्षमा असावी कारण ३५० वर्षात भगवा🚩 पहिल्यांदा शांत आहेत कारण 🇮🇳तिरंगा दुःखात आहेत☝ काल देशभरात शिवजयंती साजरी होत असताना सीमेवर आपल्या जवानांनी अशा पद्धतीने शिवजयंती साजरी करून एक आत्मविश्वास मनात दृढ करून भ्याड हल्ला करणाऱ्या शत्रूंना सम्पवण्याची शपथ खाल्ली☝ @indianarmy.adgpi

5k 28
3 days ago

🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष #२०_फेब्रुवारी_१६६० 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 छत्रपती शिवाजी महाराजांनी खारेपाटण जिंकले. खारेपाटण गाव वाघोटन खाडी किनार्‍यावर वसलेले आहे. प्राचिन काळी व्यापारी गलबते विजयदुर्गाजवळ वाघोटन खाडीत शिरत व तेथून खारेपाटण ‘‘बलिपत्तन’’ गावापर्यंत येत. येथे जहाजातून माल उतरवून तो बावडा, फोंडा घाटामार्गे देशावर पाठविला जात असे. अशा या प्राचिन बंदराचे, राजधानीचे रक्षण करण्यासाठी खारेपाटणचा किल्ला बांधण्यात आला. ८ व्या शतकापासून १८ व्या शतकापर्यंत जवळजवळ १००० वर्षाच्या इतिहासाचा साक्षिदार असलेला हा किल्ला आहे. इ.सनाच्या ८व्या शतकात शिलाहार राजांचे दक्षिण कोकणात(तळकोकणात) राज्य होते शिलाहार राजा श्वम्मियराने (इ.स ७८५ ते ८२०) येथे किल्ला उभारुन राजधानी बसविली. इ.स १६६० मध्ये छ. शिवाजी महाराजांनी राजापूर पाठोपाठ खारेपाटण किल्ला जिंकून घेतला. राजापूर येथे अटक करण्यात आलेल्या इंग्रज अधिकारी गिफर्ड यास खारेपाटण किल्ल्यातील अंधार कोठडीत ठेवण्यात आले. छ. शिवाजी महाराजानंतर इतर सागरी व खाडीवरील किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याचा ताबा कान्होजींकडे गेला. त्यानंतर तुळाजी आंग्रे याच्याकडे खारेपाटण किल्ल्याचा ताबा असताना, इ.स १८ डिसेंबर १७५५ रोजी पेशवे, इंग्रज यांच्या संयुक्त फौजांनी किल्ल्यावर हल्ला करुन तो जिंकून घेतला. इ.स १८५० मध्ये मराठे व इंग्रज यांच्यात घनघोर युध्द झाले यात हा किल्ला उध्वस्त झाला व इंग्रजांच्या ताब्यात गेला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #संदर्भ-सह्याद्रीचे अग्निकुंड © "सह्याद्री प्रतिष्ठान -महाराष्ट्र" ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ आपण आमच्या पेज ला सहभागी होऊ शकता #history_maharashtra hashtag वापरून ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ @history_maharashtra ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 @history_maharashtra #ओळख_महाराष्ट्राची #शिवरायांच्या_इतिहासाची ________________________________ #Follow: #swarajya_rakshak_sambhaji #Shantidut_mardani_akhada #photographers_of_maharashtra #chhatrapati_shivaji_maharaj #durg_naad #miekdurg #durg_bhatkanti_trekkers #sahyadri_cha_shiledar @chhatrapati_shivaji_maharaj_ @sambhaji_maharaj_1689 @budhbhushan_ @chhatrapati_sambhaji_maharaj @sambhaji_maharaj_1689 @chhatrapati_shivaji_maharaja @chhatrapati__shivaji_maharaj @r_raygad @sahayadri_travellers @sahyadriche_shiledar @durg_dhyas @forts_treasure @_sahyadri_kille_official_ @jay_maharashtra_d @garja_maharashtra_majha @yuva_maharashtra

3k 8
3 days ago

🔥 🔥👑🔥👑🔥👑🔥👑🔥👑🔥 शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला, शेकडो वर्षाची काळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय बनवणारा 👑शिवसुर्य छत्रपती शिवाजी महाराज👑 राजाधिराज छत्रपती शिवराय दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधानजागृत अष्टप्रधानवेष्टीत न्यायालंकारमंडीत शस्त्रास्त्रशांस्त्रपारंगत राजनीतीधुरंधर पौढप्रतापपुरंदर क्षत्रीयकुलावतंस सिंहासनाधिश्वर श्रीमंतयोगी महाराजाधिराज... छञपती श्री शिवाजी महाराज यांच्या ३८९ व्या जयंती निमित्त शिवजनांना , शिवकन्यांना..... शिवमावळयांना , शिवभक्तांना..... महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अठरा पगड जातीच्या सर्व शिवप्रेमी रयतेस पुन्हा एकदा मंगलमय शिवमय शिवशुभेच्छा...! 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 🔥ll जय जिजाऊ ll जय शिवराय ll🔥 ⛳ll जय हिंद ll जय महाराष्ट्र ll⛳

53k 8k 21
4 days ago

🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष ⚔ #१९_फेब्रुवारी_१६३०⚔ 🔥👑🔥👑🔥👑🔥👑🔥👑🔥 📯१९ फेब्रुवारी📯 #समस्त_शिवभक्तांच्या_दैवताचा_जन्मदिन. श्री शिवछत्रपती महाराज जन्मदिवस किल्ले शिवनेरी, (जुन्नर-पुणे), महाराष्ट्र. (तिथी प्रमाणे - फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ )🚩 शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी राजमाता जिजाऊ यांच्या पोटी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १९ फेब्रुवारी १६३० मध्ये "शिवाजीराजे" यांचा जन्म झाला. गडावरील शिवाईदेवीच्या मंदिरातील शिवाई देवीच्या नावावरून मुलाचे नाव ठेवले " शिवाजी ". शिवरायांच्या जन्माच्या तारखेवर वादविवाद होते परंतु महाराष्ट्र सरकारने २००१ साली इतिहासकारांची समिती बनवुन संशोधन करत १९ फेब्रुवारी १६३० ही तारीख शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस म्हणून जाहीर केली. 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑 सह्याद्रीचा सिँह जन्मला आई जिजाऊ पोटी! हर हर महादेवाची घुमली गर्जना गड किल्याच्या ओठी! रायगडावर तुम्ही ऊभारली ...शिवराष्ट्राची गुढी! राजे तुम्ही नसता तर सडली असती हिँदुची मढी! तुम्हा मुळे तर आम्ही पाहतो देवळाचे कळस, तुम्ही नसता तर नसती दिसली अंगनात तुळस! ||जय भवानी जय शिवराय || 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑 🚩सर्वांना शिवजयंती च्या खुप खुप शुभेच्छा🚩 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #संदर्भ-सह्याद्रीचे अग्निकुंड © "सह्याद्री प्रतिष्ठान -महाराष्ट्र" ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ आपण आमच्या पेज ला सहभागी होऊ शकता #history_maharashtra hashtag वापरून ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ @history_maharashtra ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 @history_maharashtra #ओळख_महाराष्ट्राची #शिवरायांच्या_इतिहासाची ________________________________ #Follow: #swarajya_rakshak_sambhaji #Shantidut_mardani_akhada #photographers_of_maharashtra #chhatrapati_shivaji_maharaj #durg_naad #miekdurg #durg_bhatkanti_trekkers #sahyadri_cha_shiledar @chhatrapati_shivaji_maharaj_ @sambhaji_maharaj_1689 @budhbhushan_ @chhatrapati_sambhaji_maharaj @sambhaji_maharaj_1689 @chhatrapati_shivaji_maharaja @chhatrapati__shivaji_maharaj @r_raygad @sahayadri_travellers @sahyadriche_shiledar @durg_dhyas @forts_treasure @_sahyadri_kille_official_ @jay_maharashtra_d @garja_maharashtra_majha @yuva_maharashtra at श्री शिव छत्रपती जन्मस्थान, किल्ले शिवनेरी, जुन्नर

5k 19
4 days ago

❤ ॥राजे शिवछत्रपती॥ हिरवळ देते श्रृंगार काळ्याकुट्ट मातीला, चंद्र करतो मोहक पुनवेच्या रातीला, शिवराय वाटतात भुषण छञपतीच्या जातीला, अशक्य ते काय? जर भवानीमाता साथीला, भगवे शिवधनुष्य शोभे तुझ्या निधड्या छातीला, मग.. उचल धनुष्य, जोड मनुष्य, फडकव भगवा हिँदुत्व जागवा. “जय भवानी ” ”जय शिवराय शिवजयंतीच्या शिवमय भगव्या शुभेच्छा 🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩 @history_maharashtra Edited By:-@invincible_7107

5k 1k 11
4 days ago

☝ लढुन जिंकता येत नाही म्हणून शाहिस्तेखानाने भ्याडपणे 'संग्रामदुर्गाच्या' बुरुजाखाली 'स्फोटक' रचली अन हल्ला केला. त्यात स्वराज्याचे शेकडो मावळे हुतात्मा झाले शिवरायांना प्रचंड दुःख झाले..... पण महाराजांनी निषेध नाही केला , योग्य वेळ साधुन 'शाहिस्तेखानाची' बोटंच छाटुन टाकली आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यानंतर 'स्वराज्यात' घुसताना मोगल 'दहावेळा' विचार करायला लागले. आज देशाला शिवरायांच्या 'स्मारकांची' नव्हे तर त्यांच्या 'युद्धनीतीची' गरज आहे, ती अमलात आली तरच जवानांच्या बलिदानाला न्याय मिळेल. @history_maharashtra

2k 1
5 days ago

🙏 एक विनंती☝ येणारी शिवजयंती साधेपणाने साजरी करुन सवाद्य मिरवणुक, करमणुकीचे कार्यक्रम, Dolby ला फाटा देऊन सर्व रक्कम आपल्यासाठी प्राण दिलेल्या शहिदांसाठी वळवली तर साक्षात शिवप्रभु सुद्धा समाधान पावतील. महाराष्ट्रभर संपर्कातील सर्व मंडळांना संदेश पोहोचवावा☝ #हीच_खरी_शिवजयंती❤ _________________________ _________________________ @history_maharashtra #ओळख_महाराष्ट्राची #शिवरायांच्या_इतिहासाची _________________________ _________________________

6k 19
5 days ago

🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१८_फेब्रुवारी_१६५३ छत्रपती शिवाजी महाराजांनी गोपाळ भटांस वर्षासन चालू केले. तत्कालीन जीवनात देवतांविषयी असणारी दृढ श्रद्धेची भावना व स्वामींशी इमानदारीने वागावयास लावणारी प्रचंड प्रचंड स्वामीनिष्ठा ह्या जीवनमूल्यांना फार महत्व होते. धार्मिक श्रद्धेची ही भावना अन्यत्र ही दिसते. वेदमूर्ती गोपाळ भट यांस होन शंभर वर्षासन ठरवून दिले व ते वंशपरंपरागत चालवावे असेही नमूद केले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१८_फेब्रुवारी_१६६६ मराठी फौजेने विजापूरच्या आदिलशाही मुलुखात घुसून जागोजागी हल्ले केले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #संदर्भ-सह्याद्रीचे अग्निकुंड © "सह्याद्री प्रतिष्ठान -महाराष्ट्र" 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ आपण आमच्या पेज ला सहभागी होऊ शकता #history_maharashtra hashtag वापरून ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ @history_maharashtra ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 @history_maharashtra #ओळख_महाराष्ट्राची #शिवरायांच्या_इतिहासाची ________________________________ #Follow: #swarajya_rakshak_sambhaji #Shantidut_mardani_akhada #photographers_of_maharashtra #chhatrapati_shivaji_maharaj #durg_naad #miekdurg #durg_bhatkanti_trekkers #sahyadri_cha_shiledar @chhatrapati_shivaji_maharaj_ @sambhaji_maharaj_1689 @budhbhushan_ @chhatrapati_sambhaji_maharaj @sambhaji_maharaj_1689 @chhatrapati_shivaji_maharaja @chhatrapati__shivaji_maharaj @r_raygad @sahayadri_travellers @sahyadriche_shiledar @durg_dhyas @forts_treasure @_sahyadri_kille_official_ @jay_maharashtra_d @garja_maharashtra_majha @yuva_maharashtra

2k 6
6 days ago

🚩🇮🇳 #लहुजी_राघोजी_साळवे (१४नोव्हे १७९४ - १७फेब्रु १८८१) त्यांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावातील एका मातंग कुटूंबात झाला. लहुजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे व आईचे नाव विठाबाई होते. छ.शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात लहूजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या, त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना ‘राऊत या पदवीने गौरविले. ५ नोव्हेंबर १८१७ ला पेशव्यांचे इंग्रजांसोबत खडकी येथे तुंबळ युद्ध झाले. १२ दिवस राघोजी व २३ वर्षे वयाच्या लहुजी यांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. राघोजी या युद्धात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या समोरच शहीद झाले, पेशव्यांचा पराभव झाला. पुढे इ.स. १८१८मध्ये मराठा साम्राज्याचा भगवा ध्वज शनवारवाड्यावरून हटवून तेथे इंग्रजांचा युनियन जॅक फडकला, या पराभवाने लहुजींच्या हृदयात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्वाला भडकली. स्वातंत्र्यप्रेम, देशभक्ती, देशप्रेमाने लहुजींना आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या दुःखातून सावरले. भारतमातेला इंग्रजांपासून वाचविण्यासाठी राघोजी साळवे शहीद झालेल्या ठिकाणीच लहुजींनी १७ नोव्हेंबर १८१७ ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत ‘मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी’ अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून आपल्या वडिलांची समाधी उभारली व ही समाधी अजूनही पुणे-शिवाजीनगरजवळच्या ‘वाकडेवाडी’ येथे आहे. पराक्रमी घराण्यातील लहुजींनी इंग्रजांवर मात करण्यासाठी म्हणजे पर्यायाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इ.स. १८२२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र नाना रास्ते सरदार यांच्या हस्ते सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, उमाजी नाईक, फुले यांचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हेदेखील लहुजी लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले. १७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली व एका महाक्रांतिपर्वाचा शेवट झाला. #क्रांतिवीर_लहुजी_साळवे_यांना_त्रिवार_सलाम🙏 @history_maharashtra

2k 10
6 days ago

🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 #१७_फेब्रुवारी_१७७३ कोल्हापूर करवीरच्या कर्तबगार महाराणी जिजाबाई यांचे पन्हाळा येथे निधन. करवीरच्या गादीवर सन 1714 साली ताराबाईंच्या सवतीचे पुञ संभाजी महाराज (दुसरे) हे बसले. जिजाबाई या संभाजी महाराजांच्या महाराणी होत्या. या करवीरकर जिजाबाई म्हणून इतिहासात प्रसिध्द आहेत. सातारकर शाहू छञपतींस एकाहून एक कर्तबगार पेशवे लाभून त्यांचे राज्य वाढत असता करवीर राज्य होते तसेच राहिले पण थोरले शाहूंच्या मृत्यूनंतर सातारकर छञपतींचे महत्व लोपले व पेशव्यांचे माहात्म्य वाढत गेले. सातारकर छञपतींचे राज्य पेशव्यांची दौलत म्हणून वाढत गेले. राज्यकारभारात संभाजी महाराजांस राणी जिजाबाईंचे मोठे साहाय्य होते. सन 1745 नंतर करवीर राज्याचा सर्व कारभार व धोरण स्वत: ठरवू लागल्या. करवीरकरांना पोर्तुगीज, इंग्रज, निपाणीकर असे शञू होते पण खरा शञू होता तो नानासाहेब पेशवे. मुळात नानासाहेब पेशव्यांना करवीरकरांचे स्वतंत्र अस्तित्वच मान्य नव्हते परंतू तसे उघडपणे न दाखवता संधीची वाट पाहत राहिले. जिजाबाई मुत्सद्देगिरीने वागत राहिल्या. संभाजी महाराजांना पुञ नव्हता पुढे सन 1760 साली त्यांचे निधन झाले तेव्हा त्यांची दुसरी राणी कुसाबाई गरोदर होती त्यांना पुञ होऊन करवीर गादीस वारस होईल असे जिजाबाईंना वाटत असताना पेशव्यांनी करवीर राज्य खालसा करण्यासाठी आपल्या सरदारांबरोबर फौजा धाडल्या. छञपतींचे निधन झाल्याचे ऐकून शोक समाचाराचे साधे पञही न पाठवता त्यांचे राज्यच खालसा करण्याचा नानासाहेब पेशव्यांचा स्वार्थी डाव पाहून जिजाबाई संतापून गेल्या परंतू आलेल्या संकटाला डगमगून न जाता त्यांनी आपल्या फौजेची जमवा जमव करुन पेशव्यांच्या फौजांशी वारणेच्या काठावर लढाई दिली, एवढेच नाही तर त्या फौजांचा धुव्वा उडवून दिला! याच दरम्यान पानिपतवर मोठा पराभव झाला या धक्क्यात नानासाहेब पेशवे मरण पावले, त्यांच्या मागून गादीवर आलेल्या माधवराव पेशव्याने सुज्ञपणे वागून जिजाबाई राणींना त्यांच्या इच्छेप्रमाणे करवीर राज्यास दत्तक घेण्याची संमती दिली. सन 1762 साली खानवटकर घराण्यातील एका पुञास दत्तक घेऊन जिजाबाईंनी त्यास शिवाजी महाराज म्हणून गादीवर बसवले व त्याच्या नावे 10वर्षे करवीरचे राज्य केले. जिजाबाईंनी करवीरचे राज्य पेशव्यांच्या तडाख्यातून वाचवले, ही गोष्ट सामान्य नव्हती☝ 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 #१७_फेब्रुवारी_१७७४ नारायणराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर रघुनाथराव हे पेशवे झाले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 संदर्भ-सह्याद्रीचे अग्निकुंड © "सह्याद्री प्रतिष्ठान -महाराष्ट्र" ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ @history_maharashtra

4k 9
6 days ago

🇮🇳 #खरे_देशभक्त🔥 देशात सैनिकांवर भ्याड हल्ला होणे , दोन दिवस फेसबुकवर निषेध नोंदवणे , मेणबत्त्या पेटवणे , श्रद्धांजली देणे आणि चार दिवसात सर्व विसरून जाणे हे देशाला नवीन नाही . " पाकिस्तानवर हल्ला करा आमचा सपोर्ट आहे ." हे सांगणे सोपे कारण इथे आर्मी आणि सरकारची प्रथम भूमिका असते आपली नाही . एक सामान्य नागरिक म्हणून आपण काय करू शकतो ? सैनिकांना आर्थिक मदत करू (हे सांगू नये हे कर्तव्य आहे मदत नाही ) १) देशात राहून वंदे मातरम , भारत माता की जय बोलायला नकार देणाऱ्या विरोधात बोलायची आपली हिम्मत आहे का ? २) सैनिकांवर दगडफेक करणार्याशी बोलणी करा त्यांना त्रास देऊ नका म्हणणाऱ्या विरोधात बोलायची तयारी आहे का ? ३) किमान थिएटर ,रस्त्यावर राष्ट्रगीताचा कोण अपमान करत असेल तर त्यांना तिथे सूनवणार का ? ४) बॉलिवूडमधील पाकिस्तानी कलाकार आणि त्यांना मदत करणारे आपले कलाकार यांच्यावर बहिष्कार टाकण्याची तयारी आहे का ? ५) आपल्याच देशात ज्या भागात पाकिस्तानचे झेंडे दिमाखात फडकतात ते उतरवायची हिम्मत आहे का ? ६) देशाच्या पैशांनी चालणाऱ्या अलिगढ मुस्लिम विद्यापीठ , JNU सारख्या संस्थांमध्ये जिथे शहिदांच्या मृत्यूचा आनंद साजरा केला जातो त्या विरोधात काही करायची तयारी आहे का ? ७) काश्मीरमधील पर्यटन व्यवसायावर काही काळ पूर्णपणे बहिष्कार टाकण्याची तयारी आहे का ? ८) चार युद्ध आणि शेकडो दहशतवादी हल्ले करणारा " पाकिस्तान आपला शेजारी आहे , संबंध टिकवले पाहिजेत " म्हणणाऱ्यांना जाब विचारायची तयारी आहे का ? ९) अशा संवेदनशील प्रकरणातही राजकारण घुसवणार्यांना जाब विचारणार का ? १०) काश्मीरच्या कानाकोपऱ्यात बसलेले रोहिनगे आणि बांग्लादेशी या विरोधात पावलं उचलणार का ? ११) पाकिस्तानचे झेंडे जाळण्यापेक्षा आपल्या देशात ते बनवणारे आणि कुरवळणारे यांच्या विरोधात उभे राहणार का ? हे फक्त या साठीच सांगतोय युद्धाचा पहिला नियम असतो गद्दार संपवणे . एक नागरिक म्हणून आपण हे करू शकलो तरच स्वतःला खरे देशभक्त म्हणू शकू . बाकी फेसबुकवर डीपी बदलायला फक्त २ सेकंद पुरेशी असतात. #जय_हिंद🇮🇳 #जास्तीत_जास्त_share_करा🙏

64k 12k 74
6 days ago

☝ आपल्यापैकी बहुतेकांनी साधारणतः शिवाजी महाराजांच्या काळातली अथवा पेशवाईतली अस्सल ऐतिहासिक पत्रं पाहिली असतीलच ! ही पत्रं, पाहिल्यावर बहुतेक जण मनातल्या मनात विचार करतात, तर काही तो बोलूनही दाखवतात, “शिवाजी महाराज ‘मराठी’होते ना? मग या कोणत्या विचित्र भाषेत पत्र लिहायचे?” पण जेव्हा त्यांना हे समजतं की ही पत्र मराठी भाषेतच आहेत तेव्हा मात्र त्यांचा विश्वासच बसत नाही ! कारण आपल्याला मराठी ही नेहमी ‘देवनागरी’लिपीतच वाचायची सवय असते परंतू मराठी ही देवनागरी प्रमाणेच‘मोडी’ या लिपीतही लिहीता येते. महाराष्ट्राच्या इतिहासातील बहुसंख्य कागद हे मोडी लिपीत आहेत. वास्तविक पाहता, आपल्याकडे वाङ्मय निर्मितीसाठी पूर्वीपासून देवनागरी अथवा बाळबोध लिपीचाच वापर केला जात असे. परंतू राज्यकारभाराच्या दृष्टीने ‘मोडी’ ही सोयीची असल्याने मध्ययुगात, साधारण बाराव्या शतकापासून मोडी लिपीचा वापर लिखाणासाठी मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. मोडीची उत्त्पत्ती आणि तिचे आगमन याबाबत आपल्याकडे तज्ञांमध्येच अनेक मतमतांतरे आहेत. काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की मोडी लिपी ही देवगिरीच्या यादव साम्राज्याचे, सम्राट महादेवराय यादव आणि सम्राट रामचंद्रदेव यादव यांच्या काळातील महामंत्री उर्फ पंतप्रधान (१२६०-१३०९) असणार्‍या हेमाडपंतांनी मोडी लिपी ही श्रीलंकेहून हिंदुस्थानात आणली. या हेमाडपंतांचे मूळ नाव होते ‘हेमाद्री पंडित’. यांना ‘श्री करणाधिप’ अशी पदवी होती. काही इतिहासकार मानतात की हेमाडपंतांनी मोडी श्रीलंकेतून आणली नसून त्यांनी स्वतः ती तयार केली आहे. परंतू, हिंदुस्थानातील लिपीशास्त्र तज्ञांच्या मते हेमाडपंत मोडीचे जनक नसून मोडीचे मूळ हे सम्राट अशोकाच्या काळातील राजलिपी असणार्‍या ‘ब्राह्मी लिपी’त दडलेले आहे. वस्तुतः यादव साम्राज्यातील सापडलेल्या दस्तावेजांवरून हेमाडपंतांच्या काळी राज्यातील प्रशासकीय व्यवहार हा मोडीतूनच चालत असे हे स्पष्ट झाले आहे. हेमाद्री हे यादवांच्या सुवर्णकाळात महाराष्ट्राचे पंतप्रधान होते. यावेळेस यादव साम्राज्य हे गंगासागर,सिंधुसागर आणि हिंद महासागर अशा तिनही सागरांना जाऊन भिडले होते. जर हेमाडपंतांनी मोडीचा वापर सुरू केला असे मानले तर मग,एवढ्या कमी कालावधीत राज्याच्या कानाकोपर्‍यातील प्रशासकीय अधिकार्‍यांना मोडी शिकवली कोणी वा कधी हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. शिवाय, लिपीशास्त्रकारांनी अशोकाच्या ‘ब्राह्मी लिपी’आणि ‘मोडी लिपी’तील अनेक गोष्टीतील साधर्म्य दाखवून दिल्याने मोडीला सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास आहे या गोष्टीला दुजोरा मिळतो. ✍लेख साभार:- #कौस्तुभ_कस्तुरे👌 #सविस्तर👇 at Pune City

3k 15
Next »